महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुथ्थुटू फायनान्सकडून पोलीस आयुक्त महेश भागवत यांचा सत्कार - महेश भागवत यांचा सत्कार

तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूर येथील मुथ्थुटू फायनान्सच्या शाखेवर दरोडा पडला होता. भर दिवसा टाकलेल्या या दरोड्यात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून २५ किलो सोने लंपास केले होते. त्यातील ७ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सायबराबाद आणि रचकोंडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत यश आले होते.

आयुक्त महेश भागवत यांचा सत्कार
आयुक्त महेश भागवत यांचा सत्कार

By

Published : Feb 3, 2021, 3:16 AM IST

Updated : Feb 3, 2021, 3:22 AM IST

हैदराबाद- मुथ्थुटू फायनान्सच्या वतीने रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांचा सत्कार करण्यात आला. जानेवारी महिन्यात तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूर येथील मुथ्थुटू फायनान्सच्या शाखेवर दरोडा पडला होता. भर दिवसा टाकलेल्या या दरोड्यात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून २५ किलो सोने लंपास केले होते. त्यातील ७ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सायबराबाद आणि रचकोंडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत यश आले होते.

रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्यासह सायबराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी वेळीच सुत्रे हलवून सात आरोपींना जेरबंद केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुथुटू फायनान्स यांच्याकडून आयुक्त महेश भागवत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुथ्थुटू फायनान्सचे सीईओ विनोद कृष्ण कुमार, संचालक थॉमस जॉन, मराठा मंडळाचे उपाध्यक्ष निवास निकम यांची उपस्थिती होती.

तामिळनाडूच्या होसुर शहरातील बागालूर रोडवरील मुथ्थुटू फायनान्सच्या शाखेतून दरोडेखोरांनी 25 किलो सोने आणि 96 हजार रुपये रोख रक्कम लुटली होती. दरोडेखोरांची ही आंतराज्यीय सक्रीय टोळी नागपूरमार्गे छत्तीसगडमधून मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होती. तत्पूर्वी सायबराबाद पोलिसांनी कारवाई करत सात दरोडेखोरांना ताब्यात घेतले.

Last Updated : Feb 3, 2021, 3:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details