महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 1, 2022, 6:47 PM IST

ETV Bharat / bharat

Finger Print Surgery Gang: तेलंगणात फिंगर प्रिंट सर्जरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक

आखाती देशांमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांच्या बोटांचे ठसे शस्त्रक्रियेद्वारे काढणाऱ्या टोळीचा राचकोंडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ( Finger Print ) याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

तेलंगणात फिंगर प्रिंट सर्जरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
तेलंगणात फिंगर प्रिंट सर्जरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हैदराबाद -फिंगरप्रिंट फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रियेद्वारे तरुणांच्या बोटांचे ठसे काढणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीचा राचकोंडा पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. ( Finger Print Surgery Gang ) आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी लोकांना आखाती देशांमध्ये नोकरीसाठी पाठवण्यास मदत करत असे. तरुणांना आखाती देशात पाठवण्यात एजंटांची भूमिका काय आणि अशा प्रकारे किती लोक राज्य सोडून गेले याचा तपास पोलीस करत आहेत.

अन्नोजीगुडा येथील हॉटेलमधून अटक अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मेडिकल किट, शस्त्रक्रिया आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. विश्वासार्ह माहितीवरून मलकाजगिरी झोन ​​पथकाने घाटकेसर पोलिसांसह गजलकोंडुगरी नागा मुनेश्वर रेड्डी, सागबाला वेंकट रमणा, बोविला शिव शंकर रेड्डी रेंडला रामा कृष्णा रेड्डी यांना अन्नोजीगुडा येथील हॉटेलमधून अटक केली. ( Rachakonda Police Arrested Finger Print Surgery ) हे लोकं कडप्पाहून आले होते.

औषधांशिवाय इतर साहित्य जप्त - विश्वासार्ह माहितीवरून मलकाजगिरी झोन ​​पथकाने घाटकेसर पोलिसांसह गजलकोंडुगरी नागा मुनेश्वर रेड्डी, सागबाला वेंकट रमणा, बोविला शिव शंकर रेड्डी रेंडला रामा कृष्णा रेड्डी यांना अन्नोजीगुडा येथील हॉटेलमधून अटक केली. हे लोक कडप्पाहून आले होते. आरोपींकडून सर्जिकल ग्लोव्हज, सर्जिकल टेप, सर्जिकल ब्लेड आणि औषधांशिवाय इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी चार मोबाईलही जप्त केले आहेत.

अशा रॅकेटने पोलीस हैराण याआधी सायबराबाद पोलिसांनी पॉलीमर वापरून फिंगरप्रिंटचे क्लोनिंग करून पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. मात्र, शारीरिक बोटांचे ठसे बदलून शस्त्रक्रिया करणाऱ्या अशा रॅकेटने पोलीस हैराण झाले होते. वृत्तानुसार, नोकरीच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये जाण्यासाठी बोटांचे ठसे घेणे बंधनकारक आहे. ते नाकारले गेले तर ते तिथे जाण्याची संधी गमावतात. असे असूनही, लोक परदेशात जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा -Girl Hand Cut: डॉक्टरांचा मोठा निष्काळजीपणा! कान उपचारासाठी मुलीचा हात कापला; बिहारमधील घटना

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details