महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पोलीस आयुक्त महेश भागवतांची अपघातग्रस्तांना मदत

रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी अपघातग्रस्तांना मदत करत खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे.

cp mahesh bhagwat
पोलीस आयुक्त महेश भागवतांची अपघाग्रस्तांना मदत

By

Published : Nov 26, 2020, 7:27 PM IST

Updated : Nov 28, 2020, 3:34 PM IST

हैदराबाद - रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी अपघातग्रस्तांना मदत करत खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे. चेंगीचेरला येथे 24 नोव्हेंबरला अपघात झाला होता. यात दोघांना गंभीर दुखापत झाली होती.

तेलंगाणामधील चेंगीचेरला येथे 24 नोव्हेंबरला दुपारी दुचाकी व डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील भाऊ व बहिणीला गंभीर दुखापत झाली होती. त्याचवेळी याठिकाणावरून रचकोंडाचे पोलीस आयुक्त तसेच तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत हे महानगरपालिका निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासमोर हा भीषण अपघात झाला. हे बघताच महेश भागवत यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांवर प्रथमोपचार करत त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. यानंतर भागवत यांनी त्यांच्या पोलीस टीमला सांगून चांगले उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या.

  • हैदराबाद पूरग्रस्तांना महेश भागवत यांची मदत

ऑक्टोबर महिन्यात तेलंगाणामध्ये पावसाने थैमान घातले होते. हैदराबादमधील रचकोंडा भागातही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत व त्यांच्या टीमने पुराच्या पाण्यात उतरून अनेकांना 'सहारा' दिला होता. भागवत यांनी या आपत्तीकाळात चोख बंदोबस्त ठेवत अनेकांचे जीव वाचवले. तसेच अनेकांच्या राहण्याखाण्याची सोय त्याकाळात भागवत यांनी केली होती.

हेही वाचा -हैदराबादमध्ये मुसळधार; आपत्तीकाळात 'या' मराठमोळ्या अधिकाऱ्याचा चोख बंदोबस्त

  • लॉकडाऊनकाळात बनले अन्नदाता -

वीस हजार निराधार नागरिक व ४१ वृद्धाश्रमांतील १६०० वृद्धांच्या पोटाची भूक भागवण्याचे काम पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी लॉकडाऊन काळात केले आहे. या कार्यामुळे भागवत यांची तेलंगणात अन्नदाता अशी ओळख निर्माण झाली आहे.

Last Updated : Nov 28, 2020, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details