बधरकपूर ( कोलकाता ) - मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन मॉडेलिंग आणि अभिनयात उगवता तारा असलेल्या बिदिशा डे मजुमदारने ( Bidisha De Majumdar suicide ) आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येने पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. बिदिशाने वयाच्या 21 व्या वर्षी आत्महत्या केल्याने तिचे कुटुंब आणि शेजारी यांना धक्का बसला आहे. हसतमुख मुलीने आत्महत्या का केली? हा प्रश्न त्यांना ( Bidisha Death mystery ) पडला आहे.
बिदिशा डे मजुमदारच्या कुटुंबात आई-वडिलांसोबतच लहान बहिणीही ( Bidisha De Majumdars family ) आहेत. वडिलांच्या तुटपुंज्या उत्पन्नावर हे कुटुंब अवलंबून आहे. आर्थिक सुबत्ता परत आणण्यासाठी बिदिशाने मॉडेलिंगचा मार्ग निवडला. वडिलांची संमती व आईने बिदिशाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. ग्लॅमरच्या दुनियेतही ( world of glamor of Bidisha ) ती हळुहळू स्वत:ला प्रस्थापित करत होती.
लहानपणापासूनच नृत्य, गाणे आणि चित्र काढण्याची आवड-2021 मध्ये, बिदिशाने अनिर्वेद चॅटर्जी दिग्दर्शित लघुपटातून पदार्पण केले. यात टॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा देवराज मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसला होता. कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार बिदिशाला लहानपणापासूनच नृत्य, गाणे आणि चित्र काढण्याची आवड होती. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.