महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताचं मोठं यश! 8 माजी भारतीय नौसैनिकांच्या फाशीला मिळणार स्थगिती? कतार न्यायालयानं स्वीकारलं अपील - परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची

Death Penalty Eight EX Indian Navy Officers मागील वर्षी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतार न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, आता या प्रकरणात मोठी अपडेट आली असून भारताकडून करण्यात आलेलं अपील कतार न्यायालयानं स्वीकारलं आहे.

Ministry of external affairs
परराष्ट्र मंत्रालय

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 2:18 PM IST

नई दिल्ली Death Penalty Eight EX Indian Navy Officers :हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारताच्या 8 नौदल अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावलीय. पण या शिक्षेविरोधात भारत सरकारनं अपिल करत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, भारत सरकारनं दाखल केलेल्या अपीलला कतारच्या न्यायालयानं गुरुवारी (23 नोव्हेंबर) स्वीकारलाय. तसंच या प्रकरणी पुढील सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे.

कतारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू : यासंदर्भात अधिक माहिती देत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, भारत या प्रकरणी कतारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. माजी नौदल कर्मचार्‍यांना सरकार सर्व कायदेशीर आणि वाणिज्य सहाय्य प्रदान करणं सुरू ठेवेल. ऑगस्ट 2022 मध्ये, कतारनं भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना इस्रायलसाठी हेर म्हणून काम केल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलं, ते मध्य पूर्वेकडील देशातील एका कंपनीत नोकरी करत होते, असंही ते म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण : ऑक्टोबरमध्ये कतारमधील प्रथम वर्ग कोर्टानं नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या संशयावरुन एक वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेनंतर फाशीची शिक्षा सुनावली. हे आठही अधिकारी देहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत काम करत होते. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. त्यामुळं त्यांना ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर मार्च 2023 मध्ये याप्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीदरम्यान कोर्टाला हे सर्वजण दोषी आढळले, त्यानंतर कोर्टानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

'या' अधिकाऱ्यांचा समावेश ? :कतारनं ज्या 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली त्यामध्ये कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन बिरेंद्रकुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुरनेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता आणि सेलर रागेश यांचा समावेश आहे.

  1. हेही वाचा -
  2. कतारमधील एज्युकेशन सिटी स्टेडियमचे झाले डिजीटल उद्घाटन
  3. युएई, कतार, कुवेतमधून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस अलिप्त ठेवण्याचा निर्णय
  4. कतारविरुद्ध पराभूत होऊनही भारत फिफा विश्वचषकासाठी पात्र होऊ शकतो; कसं ते जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details