महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 3, 2021, 3:48 PM IST

Updated : Jul 3, 2021, 7:13 PM IST

ETV Bharat / bharat

पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी निवड; रविवारी घेणार पदाची शपथ

पाच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री बदलण्याची तिसरी वेळ आहे. घटनात्मक पेचामुळे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

पुष्कर सिंह धामी
पुष्कर सिंह धामी

डेहराडून - उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर वेगवान राजकीय हालचाली झाल्या आहेत. भाजप आमदारांच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्रिपदाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुष्कर सिंह हे उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री ठरणार आहेत. रविवारी सायंकाळी ५ वाजता राजभवनमध्ये राज्यपाल राणी मौर्य या पुष्कर सिंह यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणार आहेत.

पाच वर्षाच्या कार्यकाळात उत्तराखंडचा मुख्यमंत्री बदलण्याची तिसरी वेळ आहे. घटनात्मक पेचामुळे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

हेही वाचा-उत्तराखंड : गेल्या 21 वर्षात 10 मुख्यमंत्री; एकानेच केला कार्यकाळ पूर्ण

तीरथसिंह रावत यांचा राजीनामा -

तीरथसिंह रावत यांनी 10 मार्च रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते लोकसभेचे खासदारही आहेत. अशा परिस्थितीत तीरथसिंग रावत यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत विधानसभेचे सदस्यत्व घेण्याचा नियम होता. म्हणजेच त्यांना कोणत्याही विधानसभा जागेवरून पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे होते. अशा परिस्थितीत राज्यातील रिक्त जागांवर नजर टाकली तर गंगोत्री, हल्द्वानी विधानसभा जागा सध्या रिक्त आहेत. परंतु कोरोना परिस्थितीत या जागांवर पोटनिवडणूक घेणे अवघड दिसत आहे. त्यामुळे नेतृत्व बदलणे हा भाजपा हाय कमांडकडे एकच पर्याय उरला होता. सर्व समीकरणे लक्षात घेता उत्तराखंड राज्यात पुन्हा एकदा नेतृत्व बदलण्याचा निर्णय उच्च कमांडने घेतला आहे.

असा आहे कायदा-

लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 151 अ नुसार निवडणूक आयोगास संसदेच्या दोन्ही सभागृहातील आणि राज्यातील विधानसभेच्या रिक्त जागा सहा महिन्यांत पोटनिवडणुकीद्वारे भरण्याचे अधिकार आहेत. मात्र, यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ शिल्लक असायला हवा.

हेही वाचा-...तर ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागेल!

घडामोंडींना वेग -

मागील तीन दिवसांपासून तीरथ सिंह रावत दिल्लीमध्ये होते. शुक्रवारी त्यांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री तीरथ सिंह रावत दिल्लीहून डेहराहूनला परतले. त्यानंतर ते थेट सचिवालयात गेले. सचिवालयातील कामकाज आटपवून पत्रकार परिषदेला संबोधित केले. मात्र त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली नाही. त्यानंतर राजभवनात पोहोचले आणि रात्री अकरा वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

उत्तरांखड विधानसभा संख्याबळ -

70 सदस्यसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपने 57 जागांवर विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. आता आगामी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये होईल. राज्यात सत्तेत येण्यासाठी 21 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. भाजपा सरकारला कोणताही धोका नसला तरी पक्षांतर्गत धुसपूस गेल्या काही दिवसांपासून वाढल्याचं दिसून येत होतं.

गेल्या 21 वर्षांत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने पूर्ण केला कार्यकाळ-

उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. भाजपाकडून मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांची गच्छंती करण्यात आली असून उत्तराखंडची कमान आता कोणाच्या हाती सोपवण्यात येणार, हे अद्याप स्पष्ट नाही. राज्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या 21 वर्षांत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने आपला कार्यकाळ पूर्ण केला.

आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ -

  1. नित्यानंद स्वामी - 9 नोव्हेंबर 2000 ते 29 ऑक्टोबर 2001
  2. भगतसिंग कोश्यारी 30 ऑक्टोबर 2001 ते 01 मार्च 2002
  3. एनडी तिवारी - 2 मार्च 2002 ते 7 मार्च 2007
  4. भुवनचंद्र खंडूरी - 8 मार्च 2007 ते 23 जून 2009
  5. रमेश पोखरियाल निशंक - 24 जून 2009 ते 10 सप्टेंबर 2011
  6. भुवनचंद्र खंडूरी - 11 सप्टेंबर 2011 ते 13 मार्च 2012
  7. विजय बहुगुणा - 13 मार्च 2012 ते 31 जानेवारी 2014
  8. हरीश रावत - 1 फेब्रुवारी 2014 ते 27 मार्च 2016/ 21 एप्रिल 2016 ते 22 एप्रिल 2016/11 मे 2016 ते 18 मार्च 2017
  9. त्रिवेंद्र सिंग रावत - 18 मार्च 2017 ते 9 मार्च 2021
  10. तीरथसिंग रावत - 10 मार्च 2021 ते 2 जुलै 2021
Last Updated : Jul 3, 2021, 7:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details