महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sidhu Moose Wala shot dead : पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या

पंजाबमधील गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली ( Sidhu Moose Wala shot dead ) आहे. अज्ञातांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala

By

Published : May 29, 2022, 7:14 PM IST

Updated : May 30, 2022, 8:20 AM IST

चंदीगढ -पंजाब सरकारने 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून होती. या निर्णयाला एक दिवस उलटला आहे. तोच पंजाबमधील गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात ( Sidhu Moose Wala shot dead ) आली आहे. अज्ञातांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पंजाब राज्यातील मानसा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पंजाब सरकारने व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतलेल्यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. मुसेवाला यांनी डिसेंबर 2022 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुसेवाला यांच्या हत्येनंतर काँग्रेसने ट्विट करत म्हटले की, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येने काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे.

424 जणांची काढली सुरक्षा -पंजाब सरकारने राजकारणी, धार्मिक नेते, माजी राज्यसभा सदस्य, माजी आमदार, माजी सभापती, निवृत्त पोलीस कर्मचारी आणि इतरांसह ४२४ लोकांना दिलेली सुरक्षा काढून घेतली आहे. त्यामध्ये या यादीत धर्मगुरूंच्या नावांचाही समावेश आहे. ज्यात जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग आणि डेरा राधा स्वामी सत्संग ब्यास आणि इतर अनेक धार्मिक नेत्यांचा समावेश आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याशिवाय पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या मुलाची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांचा मुलगा अर्जुन बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे

हेही वाचा -Aircraft Found Out : नेपाळमधील बेपत्ता विमान क्रॅश, विमानात 4 भारतीयांसह 22 प्रवासी

Last Updated : May 30, 2022, 8:20 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details