महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Punjab Youth Drowned : उना जिल्ह्यातील गोविंद सागर तलावात सात तरुणांचा बुडून मृत्यू - Punjab Youth Drowned

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील गोविंद सागर तलावात ( Gobind sagar lake una ) सात तरुणांचा बुडून मृत्यू ( Seven youths drowned ) झाल्याची माहिती आहे. सर्व युवक मोहाली पंजाबमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Punjab Youth Drowned
पंजाबचे तरुण बुडाले

By

Published : Aug 1, 2022, 8:01 PM IST

उना :हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील कोलका गावात गोविंद सागर ( Gobind sagar lake una ) तलावात ७ तरुणांचा बुडून मृत्यू ( 7 youth drowned in Govind Sagar lake ) झाला आहे. यात पंजाबमधील सात तरुणांचा समावेश आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तरुण पंजाब मोहालीचा रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे. गोविंद सागर लाठणीजवळील तलावात पोहत असताना ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच बांगणा पोलीस घटनास्थळी रवाना झाले.

गोबिंद सागर तलावात पंजाबचे तरुण बुडाले

पंजाबमधील सात तरुणांचा समावेश -बंगणा पोलिस स्टेशनमधून ( Bangana Police Station Una ) मिळालेल्या माहितीनुसार, कोलका बाबा गरीबदास मंदिराजवळील गोविंद सागर ( Govind Sagar lake ) तलावात दुपारी 3.50 च्या सुमारास ही घटना घडली. 7 तरुण बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बानुर जिल्हा महोली पंजाब येथून 11 जण बाबा बालकनाथ मंदिरात ( Baba Balaknath Temple ) जात होते. गरीबदास मंदिराजवळील गोविंदसागर तलावात बाबा स्नानासाठी गेले. पाणी खोल असल्याने सात तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलीस म्हणाले.

पंजाबचे तरुण बुडाले

हेही वाचा -Narayan Dwivedi Murder Case : अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे नारायण द्विवेदींची हत्या

प्रशासनाने मृतदेह बाहेर काढले -यातील चार तरुण कसेतरी पाण्यातून बाहेर आले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांनी मदत करण्यासाठी पोहचले मात्र, बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नाही. शेवटी पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून मृतदेहाचा शोध सुरू केला. त्यानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. एसडीएम बंगना योगराज धीमान यांनी सांगितले की, गोविंद सागर तलावात बुडून पंजाबमधील सात तरुणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

हेही वाचा -Mob Lynching in Samastipur Bihar बिहारच्या समस्तीपूरमध्ये मॉब लिंचिंग, बेल चोरी करणाऱ्याला मरेपर्यंत मारहाण

ABOUT THE AUTHOR

...view details