नवी दिल्ली/गाजियाबाद - पंजाबमधील निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी आप प्रमुख अरविंद केजरीवाल ( Arvind Kerjiwal ) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज सकाळी अचानक पंजाब पोलिसांच्या पथकाने आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नेते कुमार विश्वास ( Kumar Vishwas ) यांच्या घरी दाखल ( punjab police reached kumar vishwas house ) झाले. कुमार विश्वास यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यासंदर्भात कुमार यांनी काही छायाचित्रे ट्विट केली आहेत. या ट्विटमध्ये कुमार विश्वास यांनी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi CM Arvind Kerjiwal ) यांच्यावर निशाणा साधला आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab CM Bhagwant Mann) यांना इशारा दिला आहे.
कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "आज पहाटे अचानक पंजाब पोलीस दारात आले. एकेकाळी माझ्या हस्ते पक्षात सामील झालेल्या भगवंत मान यांना इशारा देतो की, दिल्लीत बसलेल्या व्यक्तीला (अरविंद केजरीवाल ) तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात. तो एक दिवस तुमचा आणि पंजाबचा विश्वासघात करेल, देशाने माझा इशारा लक्षात ठेवावा.''