लुधियाना: पंजाब पोलीस दलात कार्यरत असलेल्या एएसआय सुनीता राणी सध्या चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्या आपल्या कामातून समाजात मानवतेचा आदर्श निर्माण करत आहेत. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार केले नाहीत तर त्याच्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही. अशा स्थितीत काही बेवारस मृतदेहांची ओळख पटत नसल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. अशा बेवारस मृतदेहांची सुटका झाली पाहिजे, म्हणून लुधियानाच्या ASI सुनीता राणी ( ASI Sunita Rani of Ludhiana ) या चार वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 2200 मृतदेहांवर अंतिम संस्कार ( 2200 Funeral on unclaimed bodies ) केले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी पूर्ण विधिनिषेध करून बियास नदीत अस्थि विसर्जन केले आहे.
सुनीता राणी ही सेवा करत असल्याचे लुधियानामधील फार कमी पोलिस अधिकाऱ्यांना माहीत आहे. लुधियानामधील कोणत्याही रुग्णालयात जेव्हा जेव्हा वारस नसलेला मृतदेह पोहोचतो, तेव्हा सर्वात आधी सुनीता राणीची आठवण येते. सुनीता राणी सांगतात की, त्या स्वत:च्या पगारातून बेवारस मृतदेहांचा सर्व खर्च करतात. त्यांनी हे काम सुरू केले तेव्हा त्यांना काही लोकांनी साथही दिली. नंतर सर्वजण मागे हटले, पण सुनीता यांनी हे काम सुरूच ठेवले आणि एकटीने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानी सांगितले की त्या 2025 मध्ये नोकरीतून निवृत्त होणार आहेत, परंतु त्याच्या सामाजिक कार्यावर त्याचा परिणाम होणार नाही. यापुढेही त्या हे काम सुरू ठेवणार आहेत.