मोहाली :पंजाब किंग्जचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 153 धावा करू शकला. मॅथ्यू शॉर्ट 36, जितेश शर्मा 25 आणि शाहरुख खानने 9 चेंडूत 22 धावा केल्या. गुजरातकडून 4 षटकांत 18 धावांत 2 बळी घेतले. राशिद खान, मोहम्मद शमी, जोसेफ अल्झारी, जोश लिटल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. गुजरातला विजयासाठी 154 धावांचे लक्ष देण्यात आले आहे. पंजाब किंग्जची पाचवी विकेट भानुकाची 20 धावांवर आणि सहावी विकेट सॅम करणची 22 धावांवर पडली आहे. शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रार सध्या क्रीजवर आहेत. पंजाब किंग्जची चौथी विकेट जितेश शर्माच्या रूपाने पडली. गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहित शर्माने 13व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक रिद्धिमान साहाचा झेल घेतला. मोहितलाही याबाबत शंका होती. मात्र, साहाच्या मुद्यावर त्याला रिव्ह्यू घेऊन बाद देण्यात आले. जितेश 23 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. सॅम करम, भानुका क्रीजवर आहेत. 13 षटकांनंतर 94/4 धावा.
पंजाब किंग्जला तिसरा धक्का :मॅथ्यू शॉर्टच्या रूपाने पंजाब किंग्जला तिसरा धक्का बसला. 7व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅथ्यूला फिरकीपटू राशिद खानने त्रिफळाचीत केले. मॅथ्यूने 24 चेंडूत 4 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या. जितेश शर्मा, भानुका राजपक्षे क्रीजवर आहेत.पंजाब किंग्जची दुसरी विकेट कर्णधार शिखर धवनच्या रूपाने पडली. जोश लिटलच्या चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शिखरने मिडऑनला जोसेफचा झेल घेतला. शिखर 8 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. शॉर्ट मॅथ्यू आणि भानुका राजपक्षे क्रीजवर आहेत.
पंजाब किंग्जची सुरुवात खराब :गुजरातच्या मोहम्मद शमीने सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंगला शॉर्ट मिडला रशीदकरवी झेलबाद केले. शिखर धवन आणि शॉर्ट मॅथ्यू क्रीजवर टिकुन आहेत. यश दयाल आजच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. गुजरातच्या शेवटच्या सामन्यात केकेआरच्या रिंकू शर्माने यश दयालला 5 चेंडूत 5 षटकार ठोकले. आता त्याचे पडसाद उमटले आहेत. यशला आजच्या सामन्यात बाहेर बसवण्यात आले आहे. त्याच्या जागी मोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे. गुजरातकडून मोहितचा हा पहिलाच आयपीएल सामना आहे.