मुंबई - पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबने बुधवारी (दि. 13 एप्रिल)रोजी मुंबईविरुद्धच्या सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला. पीबीकेएसचा चालू मोसमातील पाच सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे. नाणेफेक हरल्यानंतर पंजाबने शिखर धवन (70) आणि कर्णधार मयंक अग्रवाल (52) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 198 धावांचा डोंगर त्यांनी उभा केला. त्याचवेळी, प्रत्युत्तरात एमआयला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 186 धावा करता आल्या. डेवाल्ड ब्रेव्हिस (49), सूर्यकुमार यादव (43) आणि तिलक वर्मा (36) यांनी मुंबईकडून फलंदाजी केली. मात्र, ते संघाला विजयाच्या गंतव्यापर्यंत पोहोचवू शकले नाहीत.
जितेश शर्माने नाबाद ३० - प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ५ बाद १९८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात मुंबई ९ बाद १८६ धावा करु शकला. यात कर्णधार रोहित शर्माने २८, ब्रेव्हिसने ४९, तिलक वर्माने ३६ व सूर्यकुमार यादवने ४३ धावांची खेळी केली. पंजाबच्या ओडियन स्मिथने ४, कागिसो रबाडाने २ बळी घेतले. तत्पूर्वी, पंजाबकडून सलामीवीर मयंक आणि शिखर जोडीने ५७ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी केली. मयंकने ३२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५२ धावा केल्या. शिखरने ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार खेचत ७० धावा ठोकल्या. जितेश शर्माने नाबाद ३० व शाहरुख खानने १५ धावा जोडल्या.