चंदीगड :पंजाबमधील मोहाली येथील इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाल्याची बातमी आहे. स्फोटामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचं सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोहाना येथील पंजाब इंटेलिजेंस ऑफिसच्या तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला. सध्या या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पंजाब: मोहालीत इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यालयाबाहेर स्फोट - मोहालीत इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यालयाबाहेर स्फोट
पंजाबमधील मोहाली येथील इंटेलिजन्स ब्युरोच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाल्याची बातमी आहे. स्फोटामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचं सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड फेकण्यात आल्याचे प्राथमिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा हल्ला आरपीजी (रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड) ने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून ग्रेनेडचा तुटलेला भाग सापडला आहे. पंजाब सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहालीमध्ये जिथे स्फोट झाला, ती दहशतवादी घटना नाही. प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला संध्याकाळी 7.30 च्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मोहालीचे एसएसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.