महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Punjab CM Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीतील रुग्णालयात भरती, संसर्ग झाल्याची माहिती - CM Bhagwant Mann health news

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना बुधवारी ( CM Bhagwant Mann admitted to hospital ) पहाटे दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आले, अशी माहिती गुरुवारी सूत्रांनी दिली. मान यांना अस्वस्थ वाटू ( Punjab CM Bhagwant Mann in delhi hospital ) लागल्याने त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात ( CM Bhagwant Mann health news ) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

CM Bhagwant Mann admitted to hospital
भगवंत मान रुग्णालयात भरती

By

Published : Jul 21, 2022, 11:04 AM IST

नवी दिल्ली -पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना बुधवारी ( CM Bhagwant Mann admitted to hospital ) पहाटे दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आले, अशी माहिती गुरुवारी सूत्रांनी दिली. मान यांना अस्वस्थ वाटू ( Punjab CM Bhagwant Mann in delhi hospital ) लागल्याने त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात ( CM Bhagwant Mann health news ) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांची पोटदुखीसाठी तपासणी करण्यात आली, त्यानंतर त्यांना संसर्ग झाल्याचे निदानात समोर आले.

हेही वाचा -National Herald Case: सोनिया गांधी आज 'ईडी'समोर होणार हजर, काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा

पोलिसांना दिल्या शुभेच्छा -एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला यांच्या दोन मारकऱ्यांना पोलिसांनी बुधवारी अमृतसर येथे कंठ स्नान घातले होते. त्यानंतर बुधवारी पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी पोलीस आणि गुंडविरोधी टास्क फोर्स यांचे अभिनंदन केले होते. जगरूप सिंग रुपा आणि मनप्रित सिंग अशी ठार झालेल्या गुंडांची नावे असून त्यांच्याकडून चकमकीनंतर एक एके 47 आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून (सीएमओ) जारी करण्यात आलेल्या निवेदनात, राज्य सरकारने राज्यातील गुंड आणि असामाजिक घटकांविरुद्ध निर्णायक युद्ध सुरू केले आहे आणि वचनबद्धतेनुसार पंजाब पोलिसांना अमृतसर येथे गुंडविरोधी मोहिमेमध्ये मोठे यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री यांनी लिहिले आहे.

मान यांचे नुकतेच झाले लग्न - 21 जुलै रोजी मान यांचा विवाह डॉ. गुरप्रित कौर यांच्यासोबत झाला. आपचे नेते भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आपने नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत 92 जागांवर विजय मिळवला होता.

हेही वाचा -President Election Result : राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, मतमोजनीला 11 वाजता सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details