महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाब मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिलेल्या नावांच्या यादीला राहूल गांधी यांचा हिरवा कंदिल; सुत्रांची माहिती - पंजाब मंत्रिमंडळ विस्ताराला राहूल गांधींची मान्यता

मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाब मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिलेल्या मंत्र्यांच्या नावांवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

list as per sources
list as per sources

By

Published : Sep 25, 2021, 12:31 PM IST

चंदीगड (पंजाब) - पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाब मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी प्रस्तावित नावांच्या यादीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून मंजुरी मिळाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तसेच आज दुपारी या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

यांचा समावेश असण्याची शक्यता -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्म मोहिंद्रा, राणा गुरजीत सिंग, मनप्रीत सिंग बादल, त्रिपाट राजिंदर सिंह बाजवा, सुखबिंदर सिंग सरकारिया, अरुणा चौधरी, रझिया सुल्ताना, डॉ. राज कुमार वेरका, भारत भूषण आशु, विजय इंदर सिंगला, गुरकीरत सिंग कोटली, राजा वरींग आणि संगत सिंग गिलजियन यांचाही समावेश होऊ शकतो. दुसरीकडे, काका रणदीप सिंह, परगट सिंग आणि कुलजित सिंग नागरा यांची नावे अंतिम झाली असल्याची माहिती आहे. नवीन यादीनुसार काँग्रेस हायकमांडने पंजाब काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, यापुढेही असेल; संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्त्युत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details