नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीत युतीच्या चर्चा होत आहेत. यातच पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री व भाजपाचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंंद्र सिंह शेखावत यांची भेट ( Captain Amarinder Singh met Union minister Gajendra Singh Shekhawat ) घेतली. काही दिवसांपूर्वी शेखावत यांनी देखील सिंग यांची भेट घेतली होती. पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पंजाब लोक कॉंग्रेस पार्टी स्थापन केली आहे. पंजाब विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी ( Punjab Assembly Election 2022 ) होणार आहे.
'आम्ही निश्चितच पंजाब निवडणूक जिंकू'
दोन्ही नेत्यात झालेल्या भेटीनंतर भाजपा नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, आम्ही अमरिंदर सिंह यांच्या पार्टीला सोबत घेऊन पंजाबमध्ये लढणार आहेत. भाजपा सोबत युती केल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, आम्ही निश्चितच पंजाब निवडणूक जिंकू.
अमरिंदर सिंह गजेंंद्र सिंह शेखावत यांची भेट
कोणता पक्ष कोणती जागा लढवणार?
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले की, आमच्या दोन्ही पक्षांमध्ये बराच काळ चर्चा सुरू होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप उमेदवारांना पाठिंबा देऊ. ती आमच्या उमेदवारांना पाठिंबा देतील. मात्र, कोणता पक्ष कोणती जागा लढवणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.
फेब्रुवारी ते मार्च दरम्यान निवडणुका होणार!
विशेष म्हणजे, कृषीविषयक कायदे परत घेतल्यानंतर अमरिंदर सिंग आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढली होती. अमरिंदर सिंग यांनी यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. यूपी, उत्तराखंड या राज्यांसह पंजाबमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान निवडणुका होणार आहेत. मात्र, आतापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
अशा असू शकतील जागा?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अजून ताकद जमवायची आहे, काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यास त्यांच्या नाजार आमदारवर त्यांची नजर असू शकते. तर युतीतील तिसरा पक्ष सुखदेवसिंग धिंडसा यांचा पक्ष आहे. असे सांगितले जात आहे की, भाजप किमान 70 जागांवर निवडणूक लढवू शकते, असे मानले जाते की ते आघाडीतील वरिष्ठ भागीदाराच्या भूमिकेत असेल. तर अमरिंदर यांची पंजाब लोक काँग्रेस 35 ते 40 जागांवर उमेदवार उभे करू शकते. उर्वरित जागा धिंडसांच्या पक्षाला मिळू शकतात.
अमरिंदर सिंग म्हणाले होते -
पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हटल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेससोबतचे 40 वर्षे जुने संबंध तोडले होते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. आपला अपमान करून मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आल्याचे अमरिंदर सिंग यांनी म्हटले होते.
हेही वाचा -Department Funds Allocation : मुख्यमंत्री शिवसेनचा, मात्र सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना