नवी दिल्ली -पंजाब विधानसभेची निवडणूक आता २० फेब्रुवारीला होणार आहे. ( Punjab Assembly Election on 20 February ) यापूर्वी 14 फेब्रुवारी मतदान होणार होते. मात्र, आता केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाची ( Election Commission of India ) तारीख ६ दिवसांनी बदलली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल याबाबत सांगितले. ( Election Commission of India on Punjab Assembly election )
यापूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांच्यासह अनेक नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या तारखेचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ 27 मार्च 2022ला संपत आहे. तसेच निवडणूक निकालाच्या तारखेत मात्र कोणताही बदल झालेला नाही. पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च 2022लाच घोषित होणार आहे. पंजाबमध्ये 117 विधानसभेच्या जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 59 जागा जिंकाव्या लागणार आहेत.