अमृतसर- पंजाबमधून उमेदवारांचे निकाल हाती येत आहेत. पंजाबमध्ये सरकार कोणाचे येणार? जुन्या परंपरेनुसार सरकार बदलेल की काँग्रेसची जादू चालेल ( Punjab election result ) याबाबत औत्सुक्य आहे. आम आदमी पक्ष सत्तेच्या जवळ येईल की त्रिशंकू विधानसभा सत्तेची नवी राजकीय समीकरणे तयार करेल? पंजाबमध्ये ही सर्व राजकीय समीकरणे ( Punjab election result date ) आज ठरणार आहेत.
- पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा पूर्व अमृतसरमध्ये 6,750 मतांनी पराभव झाला आहे. शिरोमणी अकाली दलाचे विक्रम सिंग मजिठिया यांचा पूर्व अमृतसरमध्ये 14,408 मतांनी पराभव झाला आहे.
- आपचे हकम सिंग ठेकेदार हे राजकोटमधून तर काँग्रेसचे सुखपाल सिंग खैरा हे भोलाथमधून विजयी झाले आहेत.
- डिब्रामधून आपचे हरपाल सिंग चिमा विजयी झाले आहेत.
- फिरोजपूर ग्रामीणमधून आपचे रजनी दहिया, जागरोनमधून आपचे सर्वजीत कौर मनुके आप, सुलतानपूर लोढीमधून रत्न इंदर प्रताप सिंग काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
- फत्तेगड छुरीयनमधून काँग्रेसचे त्रिपाट राजिंदर सिंग बाजवा हे विजयी झाले आहेत.
- धुरीमधून आपचे भगवंत मान विजयी झाले आहेत.
हेही वाचा-Charanjit Singh Channi Lost Election : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांना दोन्ही जागांवर मतदारांनी नाकारले, जाणून घ्या, त्याची कारकीर्द
117 जागांवर 1304 उमेदवारांचे राजकीय भवितव्य
पंजाबमधील 117 जागांवर 1304 उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला ( Punjab candidates in assembly election ) लागले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी भदौर आणि चमकौर साहिब मतदारसंघातून निवडणूक ( Punjab CM Charansingh Channi ) लढवत आहेत. याशिवाय आपचे सीएम उमेदवार भगवंत मान, काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू, अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल, सुखबीर बादल यांच्या भवितव्याचाही गुरुवारी निर्णय होणार आहे. यावेळी अकाली दलाने बसपासोबत युती केली आहे. पंजाबमधील 117 जागांपैकी 97 जागा अकाली आणि 20 जागा बसपाने जिंकल्या आहेत. कॅप्टन अमरिंदर यांच्या पक्षाव्यतिरिक्त भाजपने अकाली दलाबरोबर युती केली आहे.
हेही वाचा-Jeevanjot Kaur : नवज्योत सिंग सिद्धूसह विक्रम मजिठियांचा पराभव करणाऱ्या कोण आहेत जीवनज्योत कौर?
- कपुरथाळामधून काँग्रेसचे राणा गुरजीत सिंग तर पठाणकोटमधून अश्विनी कुमार यांचा विजय झाला आहे.
- पंजाब लोक काँग्रेसचे संस्थापक तथा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे.
- आपचे उमेदवार अजित पाल सिंग यांनी पतियालामधून अमरिंदर सिंग यांचा पराभव केला आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीत 2022 मध्ये या ठिकाणी होती अटीतटीच्या लढत
पंजाब विधानसभा निवडणुकीची लढत खूपच रंजक ठरली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्थापन केलेला नवीन पंजाब लोक काँग्रेस पक्षही यावेळी आम आदमी पक्षासोबत निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात होती. अकाली दल पहिल्यांदाच भाजपपासून वेगळे निवडणूक लढविली आहे.
हेही वाचा-Uttarakhand CM Lost : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव
- लांबा विधानसभेची निवडणूक चर्चेत राहिली. कारण, शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पाचवेळा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पाडलेले प्रकाशसिंग बादल पुन्हा एकदा रिंगणात आहेत. बादल हे देशातील सर्वात जुन्या नेत्यांपैकी एक आहेत. काँग्रेसने जगपाल सिंग यांना तर आम आदमी पार्टीने गुरमीत खुडिया यांना बादल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. लांबा विधानसभेच्या जागेवर विविध पक्षांचे एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रकाश सिंग बादल यांचा पराभव झाला.
- काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे राष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेत असतात. ते अमृतसर पूर्व विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवित होते. त्यांच्या विरोधात अकाली दलाचे नेते बिक्रम मजिठिया हे निवडणुकीच्या रिंगणात होते. वास्तविक, दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत एकही विधानसभा निवडणूक हरलेली नाही. अशा स्थितीत दोघांचा पराभव हा आपच्या नेत्या जीवज्योत कौर यांनी केला आहे. पूर्व अमृतसरमधून एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. . येथे भाजप आघाडीने जगमोहन सिंग राजू यांना उमेदवारी दिली होती. राजू हे तामिळनाडू केडरचे आयएएस अधिकारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला.
- चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यामुळे चर्चेत राहिली आहे. चन्नीही या जागेवरून निवडणूक लढवित आहेत. खरे तर काँग्रेसने त्यांना दोन विधानसभा जागांवरून उमेदवारी दिली आहे. या जागेवरून नऊ उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पक्षाने चरणजित सिंग आणि अकाली दल-बसपा युतीने हरमोहन सिंग यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांनी चन्नी यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला आहे. आहेत. याशिवाय भदौरमधून चन्नीही रिंगणात आहेत. भदौरमध्ये 13 उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पक्षाने लाभ सिंह उघोके तर अकाली दलाने सतनाम सिंग राही यांना उमेदवारी दिली आहे. मात्र चरणजीत सिंग चन्नी यांचा दोन्ही जागावर पराभव झाला आहे.
- माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी गेल्या निवडणुकीत सांगितले आहे. काँग्रेसपासून फारकत घेत ते पुन्हा रिंगणात उतरले होते. येथे एकूण 17 उमेदवार रिंगणात होते. 'आप'ने माजी महापौर अजितपाल कोहली तर काँग्रेसने माजी महापौर विष्णू शर्मा यांना रिंगणात उतरवले आहे. कॅप्टन यांच्या पक्षाची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे भाजपने येथे आपला उमेदवार उभा केलेला नाही. ही निवडणूक त्यांचे भविष्यातील राजकारण ठरवेल, असे मानले जात आहे. मात्र, अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे.
- जलालाबाद विधानसभा जागा एसएडी-बसपा युतीसाठी खास आहे. कारण अकाली मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल रिंगणात आहेत. या जागेवरून 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसने मोहन सिंग फलियानवाल यांना तर आम आदमी पक्षाने जगदीप कंबोज यांना तिकीट दिले आहे. सुखबीर सिंग यांचाही पराभव झाला आहे.
- धुरी विधानसभेची जागा आम आदमी पक्षासाठी महत्त्वाची आहे. कारण त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले उमेदवार भगवंत मान रिंगणात आहेत. या जागेसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. अकाली दलाने प्रकाश चंद गर्ग यांना तर काँग्रेसने दलवीर सिंग गोल्डी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भगवंत मान यांनी विजय मिळविला आहे.
एकदंरीत आपने मुसंडी मारून सत्तेच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार ठरणार आहेत.