महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

The Kashmir Files In Pune : काश्मिरी पंडितांना 'द कश्मीर फाइल्स'वरील कार्यक्रमात जाण्यापासून अडवले - program on 'The Kashmir Files'

काश्मिरी पंडित समुदायातील दोन सदस्यांना गुरूवारी (7 एप्रिल)रोजी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रटाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यापासून पोलिसांनी अडवले असल्याची माहिती समोर आली आहे. (Program On 'The Kashmir Files') इंडिया 4 काश्मिरचे राष्ट्रीय समन्वयक रोहीत काचरू यांनी सांगितले की 'द कश्मीर फाइल्स-एक अर्धसत्य'या कार्यक्रमाचे पुण्यात युवक क्रांती दलाकडून आयोजन करण्यात आले होते.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Apr 8, 2022, 10:37 AM IST

Updated : Apr 8, 2022, 12:57 PM IST

पुणे - काश्मिरी पंडितांना पुण्यातील 'द काश्मिर फाइल्स' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोलिसांनी रोखले. 'द कश्मीर फाइल्स-एक अर्धसत्य'या कार्यक्रमाचे पुण्यात युवक क्रांती दलाकडून आयोजन करण्यात आले होते. यावेळी इहिहासकार अशोक कुमार पांडे याचे भाषण होणार होते. (Program On 'The Kashmir Files) दरम्यान, काचरू यांनी सांगितले, की आम्ही काश्मिरी पंडित समुदायाचे सदस्य कश्मीरी मुद्द्यावर काही प्रश्न विचारणार होतो. त्यामुळेच या कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते. मात्र, पोलिसांनी आम्हाला सहभागी होण्यापासून रोखले.

माहिती देताना इंडिया 4 काश्मिरचे राष्ट्रीय समन्वयक रोहीत काचरू

द काश्मीर फाइल्स हे अर्धसत्य आहे - या चित्रपटाभोवती नेहमीच काही ना काही वाद निर्माण होतात. लेखक, इतिहासकार अशोक कुमार पांडे यांनी एक पोस्टर शेअर केले होते. ज्यामध्ये ७ एप्रिल रोजी एक कार्यक्रम आयोजित केल्याचे दाखवण्यात आले आहे. (Kashmiri Pandits Attending Program In Pune) "द काश्मीर फाइल्स हे अर्धसत्य आहे" या विषयावर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत त्यांना रोखण्याता आल्याची माहिती समोर येत आहे.

नेमक काय घडल -पुण्यातील गांधी भवन हॉल येथे गुरुवारी 'द काश्मीर फाईल्स अर्ध सत्य' या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. पण हा सगळा खोटा प्रचार असून हे थांबवा अशी विनंती पोलिसांना करत रोहित काचरू या काश्मिरी तरुणाने कोथरूड पोलिसांना हा कार्यक्रम वेळीच रद्द करा असा अर्ज लिहिला.

५ ते ६ तास बसवून ठेवले - यावर उत्तर देताना पोलीसांनी रोहित काचरू याला नोटीस पाठवली की सध्या द काश्मीर फाईल्स वरून देशात संवेदनशील वातावरण तयार झाले आहे . त्यामुळे जर तुम्ही इथे गेलात तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशी नोटीस देत त्याला कोथरूड पोलीसांनी तब्बल ५ ते ६ तास बसवून ठेवले

तरुणाला सोडवण्यासाठी देवेंद्र फडणीसांचा फोन -ही सगळी बाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना समजल्यावर त्यांनी तातडीने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना सूचना दिल्या. त्यानंतर संध्याकाळी रोहित कचरू यांची सुटका झाली. मात्र, घडलेल्या घटनेवर देवेंद्र फडणीस यांनी ट्विट करत ठाकरे सरकार काश्मिरी पंडित यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा -शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्तांवर आयकर विभागाची टाच, हवालामार्गे पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय

Last Updated : Apr 8, 2022, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details