श्रीनगर (जम्मू काश्मीर) -पुण्यातील दहशतवादी विरोधी पथक ( Pune ATS ) तपासासाठी जम्मू काश्मीर येथे दाखल झाले आहे. पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ( Pune Anti Terrorism Squad ) दापोडी परिसरातून एका तरुणाला मंगळवारी (दि. 24 मे) अटक केली होती. जुनेद मोहम्मद ( वय 28 वर्षे), असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याचे लष्कर ए तय्यबा या दहशतावदी संघटनेशी संबंध असल्याचे पुणे एटीएसचे म्हणणे आहे. याच प्रकरणी काश्मीर येथून एकाला अटक करण्यात आल्याची माहितीही पथकाही अधिकाऱ्यांनी दिली.
Pune ATS in Jammu Kashmir : जुनेद मोहम्मद प्रकरणी पुणे एटीएसकडून काश्मीरातून एकाला अटक - जुनेद मोहम्मद
पुण्यातील दहशतवादी विरोधी ( Pune ATS ) पथक तपासासाठी जम्मू काश्मीर येथे दाखल झाले आहे. पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ( Pune Anti Terrorism Squad ) दापोडी परिसरातून एका तरुणाला मंगळवारी (दि. 24 मे) अटक केली होती. जुनेद मोहम्मद ( वय 28 वर्षे), असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याचे लष्कर ए तय्यबा या दहशतावदी संघटनेशी संबंध असल्याचे पुणे एटीएसचे म्हणणे आहे. याच प्रकरणी काश्मीर येथून एकाला अटक करण्यात आल्याची माहितीही पथकाही अधिकाऱ्यांनी दिली.
जुनेदला कोठडी -अतिरेकी संघटनेकडून या जुनेद या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. त्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 3 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे आहे. मुळचा खामगाव (जि. बुलडाणा) असलेला जुनेद हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून या संघटनेच्या संपर्कात आला होता. काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेने महिनाभरापूर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले ? तो या पैशाचे काय करणार होता ? याबाबत अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. संशयीतास पुणे न्यायालयात तीन जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आङेत.
हेही वाचा -Pune ATS Arrested Man Police Custody : टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपीला ३ जून पर्यंतची कोठडी