पुद्दुचेरी -पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी 6 एप्रिल रोजी म्हणजे आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पुद्दुचेरी एक केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीप्रमाणेच येथेही निवडणूक होते. मुख्यमंत्री आणि नामांकित उपराज्यपाल आहेत. पुद्देचेरी विधानसभेत 30 जागा आहेत. ज्यासाठी 6 एप्रिल म्हणजे आज मतदान होणार आहे. येथे बहुमताचा आकडा 16 आहे.
2016 मध्ये काँग्रेसचा विजय, मात्र, सत्ता कोसळली
2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमने ( एआयएडीएमके) 4 जागांवर विजय मिळवला होता. तर अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसने ( एआयएनआरसी) 8 जागा काबीज केल्या होत्या. द्रविड मुन्नेत्र कळघमने (डीएमके) 2 जागांवर विजय मिळवला होता. तर एक अपक्ष निवडूण आला होता. अशाप्रकारे 2016 मध्ये काँग्रेस द्रमुक आघाडीने पुद्दुचेरीमध्ये सरकार स्थापन केले आणि व्ही. नारायणसामी पुद्दुचेरीचे दहावे मुख्यमंत्री बनले. पण 22 फेब्रुवारी रोजी नारायणसामी यांनी बहूमत गमावल्याने पदाचा राजीनामा दिला होता. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता काँग्रेस पुन्हा सत्तेत येत, की काँग्रेसच्या हातातून हे राज्य निसटतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमध्ये युती आहे. तर एआयएडीएमके आणि एआयएनआरसी विरोधी पक्ष आहेत.
आज मतदान