नवी दिल्ली / पटना / लुधियाना / बंगलोर / चेन्नई :ग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात उद्रेक पाहावयास मिळत ( Anti Agnipath Protest Across Country ) आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून जाळपोळ, तोडफोड व दगडफेक करून तरुणांकडून उग्रस्वरूपात आंदोलने सुरु आहेत. प्रामुख्याने रेल्वे स्थानकांना आंदोलकांकडून टार्गेट करण्यात येत आहे. देशभरातील परिस्थितीचा आढावा घेऊयात या बातमीतून..
आज बिहार बंद, ट्रक, बसेस पेटवल्या :लष्करात भरतीसाठी 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात शुक्रवारी झालेल्या उग्र निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बिहारमध्ये आज 'बंद'च्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहे. बिहारमधील संघटनांनी केंद्र सरकारला ही योजना मागे घेण्यासाठी ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. राजद आणि महागठबंधनासोबतच व्हीआयपींनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. बिहार बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक ठिकाणी कलम 144 लागू केले आहे. असे असतानाही जहानाबादमध्ये ट्रक आणि बस जाळण्यात आली.
पंजाबतही आंदोलन, किसान मोर्चा आंदोलनात सहभागी होणार :केंद्र सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध आता पंजाबपर्यंत पोहोचला आहे. लुधियाना रेल्वे स्थानकाची आज तरुणांनी तोडफोड केली. काठ्या, लोखंडी रॉड घेऊन तरुण आले. त्यांनी प्रथम स्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि नंतर आत येऊन स्टॉल्स आणि सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार तरुणांना अटक केली मात्र वातावरण तणावपूर्ण राहिले. तसेच जालंधरमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसाचार उसळला होता. सकाळी ठिकठिकाणच्या तरुणांनी एकत्र येत पीएपी चौक जाम केला. केंद्र सरकार त्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सरकारने लष्कराची खिल्ली उडवली आहे. दुसरीकडे, परिस्थिती लक्षात घेऊन जॉइंट सीपी रवचरण ब्रार, सर्व पोलिस ठाण्याचे एसएचओ घटनास्थळी पोहोचले आहेत. आंदोलक जगराव पुलाकडे कूच करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी पुलावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय लुधियानाचे पोलिस आयुक्त कौस्तुभ शर्माही यावेळी उपस्थित राहणार आहेत. पोलिसांनी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे युनायटेड किसान मोर्चा पंजाबही अग्निपथ योजनेला विरोध करत आहे. लवकरच संघटना अग्निपथ योजनेच्या विरोधात मोठा निर्णय घेणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष जगजितसिंग डेलेवाल म्हणाले की, तरुण रस्त्यावर उतरले असून सरकार गप्प आहे. अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष बलकरण सिंग ब्रार म्हणाले की, अग्निपथ योजनेमुळे लष्कराची संरचनाच नष्ट होईल. सरकारने तातडीने अग्निपथ योजना मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. देशातील सर्व तरुणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्राभिमुख धोरण तयार केले पाहिजे.
तामिळनाडूत आंदोलनाला सुरुवात : चेन्नईच्या तामिळनाडू सचिवालयाजवळील वॉर मेमोरियलजवळ 300 हून अधिक तरुण अग्निपथ प्रकल्पाला विरोध करत ( AgniPath Protest in Chennai ) आहेत. वेल्लोर, तिरुवन्नमलाई आणि तिरुपूरसह अनेक जिल्ह्यांतील अधिक सैन्य इच्छुकांनी अग्निपथ प्रकल्पाच्या विरोधात घोषणा देण्यासाठी एकत्र आले आहेत. यातील काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, तेलंगणानंतर आता तामिळनाडूतूनही अग्निपथ योजनेला विरोध करण्यात येत ( Agnipath Recruitment Scheme Protest in Chennai ) आहे.
कर्नाटकात आंदोलकांवर लाठीचार्ज : अग्निपथ योजनेच्या विरोधात कर्नाटकातही आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंगलोर शहरात लाठीचार्ज करण्यात आला आहे.
यूपीच्या जौनपूरमध्ये बस पेटवली: सैन्य भरतीला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी रोडवेज बस पेटवली. प्रवाशांना बसमधून उतरवल्यानंतर आंदोलकांनी बसची तोडफोड करत बस पेटवून दिली. चंदौली डेपोची बस लखनौहून वाराणसीला जात होती. तसेच प्रवाशांच्या वाहनांची तोडफोडही हल्लेखोरांनी केली.