दिल्ली -मोहम्मद पैगंबरांसदर्भात भाजपच्या निलंबित प्रवक्या नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात कुवैतमध्ये आंदोलन ( Protests in Kuwait ) करणाऱ्या विदेशी नागरिकांनी ( Foreign Nationals ) आंदोलन केले. या आंदोलकांना अटक करून मायदेशी पाठविण्याचे ( arrested-and-deported ) आदेश कुवैत सरकारने दिले आहेत. या आंदोलकांमध्ये भारतीय मुस्लिम देखील आहेत. कुवैतच्या कायद्यानुसार त्या देशात राहणाऱ्या विदेशी नागरिकांना कोणतेही आंदोलन करण्याचा अधिकार नाही. असे कृत्य कुवैतमध्ये कायद्याचे उल्लंघन ठरते.
कुवैतमधून हद्दपार करणार - आंदोलन करणाऱ्या नागरिकांना कुवैत सरकारने अटकेचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच या सर्व नागरिकांना देशाच्या कायद्यानुसार कुवैतमधून हद्दपार केले जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कुवैतमध्ये झालेल्या आंदोलनाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कुवैत सरकार या सर्व लोकांना अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहे. कतर येथील निर्वासन केंद्र या सर्व लोकांच्या हद्दपारीसंदर्भात कार्यवाही करीत आहे. या सर्वांना पुन्हा कधीही कुवैतमध्ये प्रवेश मिळणार नाही.