अनंतनाग (जम्मू आणि काश्मीर) : राज्य तपास यंत्रणेने (SIA) शनिवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले. (SIA raids in Kashmir). छाप्यांदरम्यान एसआयएने बिजबहाराच्या सिरहामा गावात प्रतिबंधित सामाजिक-राजकीय संघटना जमात-ए-इस्लामीच्या (Jamaat E Islami) अनेक स्थावर मालमत्ता जप्त केल्या. (properties of Jamaat e Islami seized by SIA). संलग्न मालमत्तेमध्ये दुमजली घर आणि सात मर्ला जमीन आहे. राज्य तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार ही मालमत्ता जमात-ए-इस्लामीने खरेदी केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील फुटीरतावादाला कथितपणे समर्थन केल्याबद्दल प्रशासनाने 2017 मध्ये या संघटनेवर बंदी घातली आहे.
डिसेंबरमध्ये 20 मालमत्ता जप्त : SIA टीमने एका प्रकरणाच्या तपासादरम्यान मालमत्ता सील केली आहे. याप्रकरणी तात्काळ कोणालाही अटक करण्यात आली नसून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी NIA आणि SIA द्वारे काश्मीर खोऱ्यातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यात फुटीरतावादी नेते आणि जमात-ए-इस्लामी यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फुटीरतावादी नेते दिवंगत सय्यद अली गिलानी यांच्या नावावर नोंदवलेल्या काही मालमत्तांसह एकूण 20 मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.