नवी दिल्ली -काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाऊबीज निमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले की, माझा भाऊ करुणा, प्रेम आणि धैर्याने सत्यासाठी लढत आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. आज देशभरात भाऊबीज साजरी केली जात आहे. प्रियंका आणि राहुल गांधी यांनीही आज भाऊबीज साजरी केली.
प्रियंका गांधींनी शेयर केला जुना फोटो -
प्रियंका गांधी यांनी ट्विट करून लिहिले, मला अभिमान आणि आनंद आहे की माझा भाऊ करुणा, प्रेम आणि धैर्याने सत्याची लढाई लढत आहे. तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या भावाने नेमबाजी स्पर्धेत बरीच पदके जिंकली होती, त्यावेळचा हा फोटो आहे.
देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह सुरू आहे. यातील भाऊबीज हा महत्वाचा दिवस आज साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांचा जुना फोटो सोशल मीडियावर शेयर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
हेही वाचा -अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; रवानगी आर्थर रोड कारागृहात