नवी दिल्ली - बसंत पंचमीच्या निमित्ताने माझ्या आजी इंदिरा गांधी शाळेत जाण्यापूर्वी आमच्या दोघांच्या खिशात पिवळा रुमाल ठेवायच्या, असे प्रियंका गांधी वड्रा यांनी म्हटले आहे. ट्विट करत त्यांनी आजींच्या आठवणींना उजाळा दिला.
सरस्वतीची उपासना

वसंत ऋतूचे आगमन दर्शविणारी बसंत पंचमी उत्साहात साजरी केली जाते. बसंत पंचमी ही ज्ञानदेवी, सरस्वती देवीला समर्पित आहे. आपल्या भक्तांना ज्ञान देणारी देवी म्हणून सरस्वतीची उपासना केली जाते.
'आजही पंचमीची परंपरा चालू'
याचनिमित्ताने प्रियंका गांधींनी ट्विट करत बसंत पंचमीच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. आजही पंचमीची परंपरा चालू ठेवून माझी आई मोहरीची फुले मागवते आणि यादिवशी घर सुशोभित करते. ज्ञानाची देवी सरस्वती सर्वांचे भले करो. आपणा सर्वांना बसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, असे त्यांनी ट्विट केले आहे.