नवी दिल्ली - काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रियांका यांनी शुक्रवारी सांगितले की, काही हलकेसे लक्षण जाणवत होते. त्यानंतर चाचणी केली त्यावर रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
Priyanka Gandhi: प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती - प्रियंका गांधी यांना कोरोना झाला
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला घरी क्वारंटाइन केले आहे. प्रियांका यांनी सांगितले की, काही हलकेसे लक्षण जाणवत होते. त्यानंतर चाचणी केली त्यावर रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
प्रियांका यांनी ट्विट करून म्हटले की, 'मला काही सौम्य लक्षण जाणवत असल्याने कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर पॉझिटीव्ह आली आहे. सध्या मी सर्व नियम पाळत आहे. दरम्यान, मी स्वतःला घरी क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी सर्व आवश्यक खबरदारी घेण्याची विनंती करते असही त्या म्हणाल्या आहेत.
कालच त्यांनी लखनऊ दौरा केला - काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी कालच लखनऊ दिल्लीला परतल्या होत्या. दोन दिवसीय नव संकल्प चिंतन शिबिरासाठी त्या लखनऊ गेल्या होत्या. दरम्यान, एक दिवसापूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी माहिती दिली होती.