नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई (priyanka chopra becomes mother) झाली आहे. याची माहिती तीने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. तीच्या मुलाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून (son through surrogacy) झाला आहे. प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले होते. प्रियांका चोप्राने 2000 साली मिस वर्ल्डचा किताबही जिंकला होता.
सोशल मीडियावर आई होण्याबाबत माहिती देताना प्रियांका चोप्रा म्हणाली, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आम्ही सरोगसीच्या माध्यमातून मुलाचे स्वागत करत आहोत. आम्ही आदरपूर्वक सांगू इच्छितो की या विशेष काळात आमच्या गोपनीयतेची काळजी घेत असताना, आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. धन्यवाद. 2018 मध्ये प्रियंका चोप्राने निक जोनासशी लग्न केले आणि बहुतेकदा अमेरिकेत राहते.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत..
प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एकेकाळी चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री राहीली आहे. आपल्या अभिनयासाठी तीला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2016 मध्ये, भारत सरकारने प्रियांका चोप्राला पद्मश्री देऊन सन्मानित केले आणि टाइम मासिकाने तिला जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केले. फोर्ब्सने तिला जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीतही स्थान दिले आहे.