अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या ( Gujarat Assembly Election 2022 ) दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी( PM Narendra Modi ) आज सकाळी अहमदाबादमध्ये मतदान करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 8.30 वाजता राणीप येथील निशान शाळेत ( Nishan School ) मतदान करणार आहेत. पीएम मोदी हे येथील नोंदणीकृत मतदार आहेत. त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांच्यासह या बूथवर त्यांचे नाव नोंदणीकृत आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल करणार मतदान :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सकाळी 10.30 वाजता कमलेश्वर मंदिराजवळील नारायणपुरा येथे मतदान करणार आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सकाळी 9 वाजता शिळज प्राथमिक शाळेतील बुथ क्रमांक 95 वर मतदान करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात २.५१ कोटी मतदार आहेत. मतदान सकाळी ८ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५ वाजता संपेल. दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 जागा आहेत. त्यापैकी 6 जागा अनुसूचित जातीसाठी तर 13 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. ( Narendra Modi will Vote In Nishan School )