महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकी दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. ते 26 सप्टेंबला दिल्लीला परततील अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरश्रा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह एक उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडल या दौऱ्यात पंतप्रधानांबरोबर असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार

By

Published : Sep 22, 2021, 10:00 AM IST

नई दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकी दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. ते 26 सप्टेंबला दिल्लीला परततील अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरश्रा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह एक उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडल या दौऱ्यात पंतप्रधानांबरोबर असणार आहे. अशी माहितीही श्रृंगला यांनी दिली आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांच्याबरोबर द्विपक्षीय मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. तसेच, ते अन्य नेत्यांसोबतही चर्चा करणार आहेत. याबरोबरच ते संयुक्त राष्ट्र महासभेलाही संबोधीत करणार आहेत.

25 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार

यामध्ये मोदी पहिल्या दिवसी अमेरिका राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी आयोजीत केलेल्या कोरोना बाबातच्या जागतिक शिखर परिषदेत भाग घेतील. दरम्यान, 24 सप्टेंबरला मोदी बाइडेन यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यावर भारत-अमेरिका संबंधावर चर्चा करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने, दोन्ही देशांचे सहकार्यातून व्यापार वाढवणे, सुरक्षा, सरकार्य यावर चर्चा होणार आहे. अशी माहिती श्रृंगला यांनी दिली आहे. तसेच. 25 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत. यामध्ये ते आतंकवाद, कोरोना आणि हवामान बदलावर जागतिक उपाय यावर ते बोलणार आहेत.

अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य होण्याच्या भारताच्या प्रयत्नाबद्दल परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा कशी होऊ शकते, हे पंतप्रधान आपल्या अभिभाषणात नमूद करतील. त्यामध्ये त्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे. दरम्यान, भारतात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील अशी माहितीही श्रृंगला यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी 25 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करतील. तसेच, या अधिवेशनात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन जागतिक नेत्यांनाही संबोधित करतील. अशी माहिती संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सोमवारी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details