नवी दिल्ली: पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण ( PM Modi Parakram Diwas ) केले. इंडिया गेटवर उभारण्यात येणाऱ्या नेताजींच्या ग्रॅनाईटच्या पुतळ्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी आज होलोग्राम पुतळा राष्ट्राला समर्पित केला. हा होलोग्राम पुतळा 28 फूट उंच आणि 6 फूट रुंद आहे. होलोग्रामची प्रतिमा 30,000 लुमेन आणि 4K प्रोजेक्टरद्वारे ( hologram statue 30000 lumens 4K projector ) चालणारी असेल. 90% पारदर्शक असलेली होलोग्राफिक स्क्रीन अदृश्यपणे लावण्यात आली आहे. हाय गेन स्क्रीनची वैशिष्ट्ये अशी आहेत की, ती कुणाला दिसत नाही. होलोग्रामचा अचूक प्रभाव निर्माण करण्यासाठी नेताजींचे थ्रीडी चित्र हाय गेन स्क्रीनवर ठेवण्यात आले आहे.
तत्पूर्वी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याच्या संदर्भात सांगितले की, हा केवळ ग्रॅनाइटचा पुतळा नसून, महान नेताजींना योग्य श्रद्धांजली आहे. शाह म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी सर्वस्वाचा त्याग केला होता.
होलोग्राम पुतळ्याच्या अनावरण आणि सुशोभीकरण समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांसमोर नतमस्तक होण्यास नकार दिला होता, असे ते म्हणाले. होलोग्राम पुतळ्याची जागा लवकरच भव्य ग्रॅनाईटच्या पुतळ्याने घेतली जाईल. नेताजींचा पुतळा लोकशाही मूल्ये आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देईल, असे ते म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील आमच्या पुढाकाराचे कौतुक केले. ते म्हणाले, यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कृषी विभागाकडून केले जात असे. आमच्या सरकारने एनडीआरएफला बळकटी दिली. आज आपत्ती व्यवस्थापन हे लोकसहभागाचे आणि लोकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. महामारीच्या काळात नवीन संकटांचा सामना करावा लागला. एनडीआरएफ, एसडीआरएफला सलाम करताना, पीएम मोदी म्हणाले की, आपत्ती निवारणाच्या वेळी या एजन्सींचा समन्वय प्रशंसनीय आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारतातील विविध लोक आणि संस्थांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची आणि निःस्वार्थ सेवेची प्रशंसा आणि सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने वार्षिक सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार ( Subhas Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar )सुरू केला आहे. दरवर्षी 23 तारखेला हा पुरस्कार जाहीर केला जातो. या पुरस्कारांतर्गत, संस्थेला 51 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते आणि व्यक्तीला 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाते.