नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. 2 मे )रोजी पहाटे तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी नवी दिल्लीहून जर्मनीला रवाना झाले. पंतप्रधान कार्यालयाने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. पंतप्रधान जर्मनी येथे सोमवारी पोहोचतील, जिथे ते जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासोबत 6 व्या भारत-जर्मनी चर्चेत (IGC) बैठकीत सहभागी होतील. ( PM Modi Leaves Three-Day European Visit ) त्यानंतर ते मंगळवारी डेन्मार्कला जाणार आहेत आणि नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा समारोप पॅरिसमध्ये मुक्कामाने होईल, जेथे फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची ते भेट घेणार आहेत.
2 मे 2022 रोजी जर्मनीचे फेडरल चांसलर महामहिम ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून बर्लिन, जर्मनीला पंतप्रधान भेट देणार आहेत. त्यानंतर 3 ते 4 मे यामध्ये बर्लिन, जर्मनीला भेट देणार आहेत. (PM Modi Leaves European Visit) डेन्मार्कचे पंतप्रधान, मेटे फ्रेडरिकसन यांच्या निमंत्रणावरून कोपनहेगन, डेन्मार्कला भेट देणार आहे. ये द्विपक्षीय बैठकांनाही मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच, दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेलाही मोदी उपस्थित राहणार असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.