पॅरिस - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली आणि भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर सहमती दर्शवली.
माझे मित्र राष्ट्रपती यांना भेटून नेहमीप्रमाणेच आनंद झाला. आम्ही द्विपक्षीय तसेच जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. भारत आणि फ्रान्स हे अभिमानास्पद विकास भागीदार आहेत (French President Emmanuel Macron) आणि आमच्या भागीदारी विविध क्षेत्रात पसरल्या आहेत," पंतप्रधान मोदींनी इंग्रजी आणि फ्रेंच भाषांमध्ये ट्विट केले. सोबत त्यांचा आणि मॅक्रॉनचा एकमेकांना मिठी मारतानाचा फोटो.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही ट्विट करून या भेटीची माहिती दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात महत्वाची चर्चा झाली. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्यासाठी महत्त्वाकांक्षी अजेंड्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. भारत-फ्रान्स भागीदारी ही शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी एक शक्ती आहे, असाही संदेश यावेळी देण्यात आला.