अहमदाबाद :पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी सोमवारी गुजरातमधील जनतेला विशेषत: तरुण आणि महिलांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. जी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये मतदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान ( Nishan Public school ) केले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, मी गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्व लोकांना, विशेषत: तरुण मतदार आणि महिला मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो.
रांगेत थांबून केले मतदान :गुजरातमधील 14 जिल्ह्यांतील 93 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहमदाबादमध्ये मतदान करणार आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे त्यात बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरावली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदयपूर यांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9.30 च्या सुमारास राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्रावर पोहोचले. येथे त्यांनी रांगेत उभ्या असलेल्या लोकांसोबत मतदान केले. यावेळी पंतप्रधानांनी समोर उभ्या असलेल्या लोकांना हात जोडून अभिवादन केले. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अहमदाबादमध्ये पोहोचले. येथील शिलाज अनुपम शाळेत उभारलेल्या बूथवर त्यांनी मतदान केले.