धारवाड (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार कर्नाटकच्या उत्तर बेंगळुरू भागात एक रोड शो केला, जिथे प्रचंड गर्दी दिसून आली. राज्यातील तिसर्या जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर मोदींचे बेळगावी जिल्ह्यातील कुडाची येथून सायंकाळी पाचच्या सुमारास येथे आगमन झाले. त्यांनी खास डिझाइन केलेल्या वाहनातून रोड शोम केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवी टोपी परिधान केली होती. मोदींसोबत बेंगळुरू उत्तरचे खासदार डी.व्ही. सदानंद गौडा आणि भाजपचे विधान परिषद सदस्य सी. नारायणस्वामीही उपस्थित होते.
कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी मतदान : मोदी आज सकाळी दिल्लीहून बिदरला पोहोचले. बीदरमधील हुमनाबाद, विजयपुरा शहर आणि बेळगावी जिल्ह्यातील कुडाची येथे त्यांनी जाहीर सभांना संबोधित केले. पंतप्रधान शनिवारी बेंगळुरूमध्ये रात्रीचा मुक्काम घेतील आणि रविवारी सकाळी कोलार शहर, रामनगर जिल्ह्यातील चन्नापटना आणि हसन जिल्ह्यातील बेलूर येथे जाहीर सभा घेण्यासाठी रवाना होणार आहेत. दिल्लीला परतण्यापूर्वी मोदी रविवारी म्हैसूरमध्ये रोड शोही करणार आहेत. कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.