नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दोन दिवसीय गुजरात दौरा (PM Modi In Gujrat) आजपासून सुरू होत आहे. पीएम मोदी 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी त्यांच्या गृहराज्य गुजरातला भेट देतील आणि तेथे 15,670 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
PM Modi In Gujrat: पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर, 'इतक्या' कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दोन दिवसीय गुजरात दौरा (PM Modi In Gujrat) आजपासून सुरू होत आहे. पीएम मोदी 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी त्यांच्या गृहराज्य गुजरातला भेट देतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
पीएमओने सांगितले की, मोदी प्रथम गांधीनगरमधील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये डिफेन्स एक्स्पो २०२२ चे उद्घाटन करतील. यानंतर ते अडालजमध्ये 'मिशन स्कूल्स ऑफ एक्सलन्स' सुरू करणार आहेत. तसेच पंतप्रधान जुनागडमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. यानंतर संध्याकाळी 6 वाजता ते राजकोटमध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'इंडियन अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम सर्व भागधारकांना त्यांच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी तसेच तंत्रज्ञान सामग्री आणि प्रक्रियांच्या विविध पर्यायांबद्दल विचार मांडण्यासाठी व्यासपीठ प्रदान करेल. या कार्यक्रमात 200 हून अधिक तंत्रज्ञान प्रदाते सहभागी होण्याची आणि त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची अपेक्षा आहे.
राजकोटमध्ये एका प्रदर्शनाचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पीएमओने सांगितले की, गुरुवारी मोदी केवडियामध्ये 'मिशन लाइफ' लाँच करतील. ते मिशन प्रमुखांच्या 10 व्या परिषदेला उपस्थित राहतील आणि त्यानंतर व्यारा येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. गुजरातमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग कधीही निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो, असे मानले जात आहे.