मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवार (दि. 19 जानेवारी)रोजी मुंबईत आहेत. या दौऱ्यासाठी भाजपकडून तयारी करण्यात आली आहे. तसेच, मुंबई पोलिसांकडूनही हा दौरा व्यवस्थित होण्यसाठी विषेश तयारी करण्यात आली आहे. येथील बीकेसी एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ते मेट्रो ७चे उद्घाटन करणार आहेत. या सर्व कार्यक्रात मुंबई पोलिसांनी ड्रोन, पॅराग्लाइडर, रिमोट कंट्रोल मायक्रोलाईटर, एअरक्राफ्ट हे संसाधन वापरण्यावर बंदी घातली आहे.
प्रत्येक घटनेचे अपडेट खालीलप्रमाणे
03 : 45
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसी येथील कार्यक्रमात एक कमान कोसळली आहे. स्टेजच्या मागच्या बाजूने बांधलेली लोखंडी कमानी कोसळली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे.
03:28 PM
नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वागत करण्यासाठी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. तर भाजपा आणि शिंदे गटाचे सगळे मंत्री व्यासपीठावर करणार मोदींच स्वागत आहेत.
03:25 PM
निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पंतप्रधान मुंबईत, भास्करराव जाधव यांचा हल्लाबोल
कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात, पण नरेंद्र मोदी मुंबईत आले नाहीत. कोरोनाकाळात मोदी साहेबांनी विशेष काळजी मुंबईत घेतलेली नाही.पूर्वी शिवसेनेने जी काम आखली होती त्यांचेच उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करायची, ही नरेंद्र मोदी यांचे खासियत आहे.
01:55 PM
...हीच शिवसेनेची ताकद : अंबादास दानवे
मुंबई पालिका निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत, हीच शिवसेनेची ताकद आहे, असे शिवसेनेचे ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे म्हटले आहे.
01:40 PM
सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. सभेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्क्रीनिंग होत आहे. दरम्यान, सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते, लाभार्थी यांच्यासाठी वेगवेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
12:43 PM
कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज झाले आहेत. मुंबईतील विरोधी पक्षातील खासदार, आमदाराचे निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निमंत्रण द्यायला आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना विचारला जाब विचारल्याचे समजते. दरम्यान, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने शिवसेना ठाकरे गटात नाराजी आहे.
12:36 PM
कल्याण, डोंबिवलीमधून 150 पेक्षा अधिक बसेस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कल्याण, डोंबिवलीमधून 150 पेक्षा अधिक बसेस येणार आहेत. स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी या बसमध्ये आपल्या परिसरातील कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत येणार आहेत.
12:03 PM
शिंदे गटांच्या नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आहे.
11:47 AM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजचे कार्यक्रम
दुपारी 4.40 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करणार
सायं. 5 : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई
सायं. 6.30 : मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई
सायं. 7.20 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार.
11:35 AM
मुंबईतील 'या' बॅनर्सची चर्चा
मुंबईतील गिरगाव आणि मरीन लाइन्स येथे बॅनर्स लावण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील आगमनापूर्वीच हे बॅनर्स लावण्यात आली आहेत. बाळासाहेबांपुढे मोदींची मान झुकते, अशा आशयाचे हे बॅनर्स झळकवण्यात आले आहे. त्यामुळे या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
11:21 AM
'निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा'