महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shivraj Singh Chauhan : 'पंतप्रधान मोदी हे सुपर ह्यूमन असून त्यांच्यात दैवी शक्ती', मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचं वक्तव्य - Prime Minister Modi is a Superhuman

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ( Shivraj Singh Chauhan in Goa ) पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दैवी शक्ती असल्याचे म्हटलं आहे. नरेंद्र मोदींचे व्यक्तित्व अविश्वसनीय असून ते देशाचे पंतप्रधान आहेत, हे आपले भाग्य आहे, असेही चौहान म्हणाले.

Shivraj Singh Chauhan
मुख्यमंत्री शिवराज सिंह

By

Published : Feb 2, 2022, 2:44 PM IST

पणजी - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan in Goa ) मंगळवारी गोव्यात ( Madhya Pradesh Chief Minister in Goa ) दाखल झाले. यावेळी त्यांनी अजब वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन असून त्यांच्यामध्ये दैवी शक्ती असल्याचे ते म्हणाले. गोव्यातील एका मतदारसंघात रॅलीला ते संबोधित करत होते.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची सभा...

मी एक भाजपा कार्यकर्ता आणि मुख्यमंत्री आहे, म्हणून मोदींमध्ये दैवी शक्ती असल्याचे म्हणत नाही. मी अनुभवलं असून माझ्या हृदयापासून म्हणत आहे. नरेंद्र मोदींचे व्यक्तित्व अविश्वसनीय असून ते देशाचे पंतप्रधान आहेत, हे आपले भाग्य आहे, असेही चौहान म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी भारत देशाचा जगभरात गौरव केला आहे. काँग्रेस सत्तेत असताना विदेशी नागरिक भारतीय नागरिकांचे उपेक्षा करत. सम्मान देत नसत. पण, आता परिस्थिती बदलली आहे, असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतूक केले.

शिवराज सिंह चौहान यांनी मुरगाव तालुक्यात आपली प्रचारसभा घेऊन 2017 ला चारही जागांवर ज्याप्रमाणे भाजपचा विजय झाला, त्याची पुनरावृत्ती 2022 ला होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोवा भाजपाच्या विकासामुळे राज्यात रस्ते, जलवाहतूक , रेल वाहतूक हवाई तसेच इंटरनेटचे जाळे विणले गेले आहे. त्यामुळे छोटंसं राज्य असणाऱ्या गोव्याचा नावलौकिक सगळीकडे पोहचल्याचे चौहान आपल्या भाषणात म्हणाले.

हेही वाचा -Goa Assembly elections : गोव्यात काँग्रेस आणि भाजपची सेटींग.. लोबो निवडून आल्यावर भाजपात जातील - किरण कंडोळकर

ABOUT THE AUTHOR

...view details