अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Modi ) गुरुवारपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या दोन दिवसीय गुजरात ( Prime Minister on Gujarat tour ) दौऱ्यात 29,000 कोटी ( Inauguration projects worth 29 thousand crores ) रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये भावनगर येथील जगातील पहिले सीएनजी ( Compressed natural gas ) टर्मिनल, अहमदाबादमधील मेट्रो फेज-1, सुरतमधील डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल (ड्रीम) सिटीचा टप्पा-I यांचा समावेश आहे.
विविध योजनाचे उद्घाटन - या भेटीदरम्यान, पंतप्रधान 'गांधीनगर-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच 36 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. जवळपास तीन दशकांपासून गुजरातमध्ये सत्ता गाजवणारा भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्ता टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
CNG टर्मिनलची पायाभरणी -तसेच मोदी सुरत शहरातील लिंबायत भागात एका सभेला संबोधित केल्यानंतर त्यांच्या यात्रेला सुरुवात करतील, असे, गुजरात सरकाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यादरम्यान ते 3 हजार 400 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करणार आहेत. सुरत नंतर भावनगरला पोहोचल्यानंतर पंतप्रधान सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील. ज्यात जगातील पहिल्या CNG टर्मिनल, 'ब्राऊनफील्ड पोर्ट'च्या पायाभरणीचा समावेश आहे.