महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रपती कोविंद रुग्णालयात दाखल; छातीत दुखत असल्याची तक्रार - रामनाथ कोविंद रुग्णालयत दाखल

यावेळी त्यांची नियमित तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना निरीक्षणात ठेवण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तसेच, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले...

Prez Kovind in hospital after chest discomfort
राष्ट्रपती कोविंद रुग्णालयात दाखल; छातीत दुखत असल्याची तक्रार

By

Published : Mar 26, 2021, 3:58 PM IST

नवी दिल्ली : छातीत दुखत असल्या कारणाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज सकाळी (शुक्रवार) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

सध्या प्रकृती स्थिर..

यावेळी त्यांची नियमित तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना निरीक्षणात ठेवण्यात आले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तसेच, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले.

तपासण्यांनंतर मिळणार डिस्चार्ज..

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय चाचण्या पूर्ण होईपर्यंत राष्ट्रपती कोविंद हे रुग्णालयातच राहणार आहेत.

हेही वाचा :पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर; राष्ट्रीय शहीद स्मारकाला दिली भेट

ABOUT THE AUTHOR

...view details