महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रपती निवडणूक २०२२ - द्रौपदी मुर्मू एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार, 'हे' राज्यपाल देखील झाले होते राष्ट्रपती - शंकर दयाल शर्मा

झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून एनडीएने घोषित केले आहे. आता त्या राष्ट्रपती होण्यापूर्वी राज्यपाल असलेले असे कोण-कोण राष्ट्रपती झाले आहेत हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल.

राष्ट्रपती निवडणूक २०२२ - द्रौपदी मुर्मू एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार
राष्ट्रपती निवडणूक २०२२ - द्रौपदी मुर्मू एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार

By

Published : Jun 22, 2022, 10:06 AM IST

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने (भाजप) राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी एनडीएच्या वतीने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तत्पूर्वी, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी मंगळवारी येथील पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या सर्वोच्च धोरणात्मक मंडळाची संसदीय मंडळाची बैठक झाली.

बैठकीनंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, संसदीय मंडळाच्या बैठकीत एनडीएने सर्व घटकांसह आपला उमेदवार जाहीर करावा, असे मत सर्वांनी मांडले. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू असतील. द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जर त्या जिंकल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती तसेच देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. या अनुषंगाने देशात आतापर्यंत असे किती राष्ट्रपती झाले आहेत ज्यांनी यापूर्वी राज्यपालपद भूषवले होते, त्याची माहिती घेऊयात.


व्ही.व्ही.गिरी (१० ऑगस्ट १८९४ - २४ जून १९८०) - व्ही. व्ही. गिरी हे भारताचे चौथे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1894 रोजी ब्रह्मपूर, मद्रास प्रेसिडेन्सी येथे झाला. जो आता ओडिशाचा भाग आहे. त्यांच्या वडिलांचे नाव जोगीह पंतुलु होते आणि ते व्यवसायाने वकील होते. 1937-39 आणि 1946-47 या काळात ते मद्रास सरकारमध्ये कामगार, उद्योग, सहकार आणि वाणिज्य खात्यांचे मंत्री होते. गिरी यांनी 1 जुलै 1960 रोजी केरळचे दुसरे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. ते (1960-1965) 5 वर्षे केरळचे राज्यपाल होते. त्यानंतर भारताचे तिसरे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी १३ मे १९६७ रोजी शपथ घेतली. 3 मे 1969 पर्यंत ते देशाचे उपराष्ट्रपती होते. 1969 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आणि ते भारताचे पहिले स्वतंत्र आणि देशाचे चौथे राष्ट्रपती बनले.

शंकर दयाळ शर्मा (१९ ऑगस्ट १९१८ - २६ डिसेंबर १९९९) - शंकर दयाळ शर्मा हे देशाचे ९वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1918 रोजी झाला. 26 डिसेंबर 1999 रोजी त्यांचे निधन झाले. ते भारताचे 8 वे उपराष्ट्रपती होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशची राजधानी भोपाळजवळील आमोन गावात झाला. 25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997 पर्यंत ते देशाचे राष्ट्रपती होते. 29 ऑगस्ट 1984 ते 26 नोव्हेंबर 1985 पर्यंत ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते. यापूर्वी ते 26 नोव्हेंबर 1985 ते 2 एप्रिल 1986 पर्यंत पंजाबचे राज्यपाल होते. ते 1952 ते 1956 पर्यंत भोपाळ (आता मध्य प्रदेश) चे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी शिक्षण, कायदा आदी विभागात बरीच कामे केली. 1974 ते 1977 या काळात ते देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्रीही होते.

प्रतिभा देवी सिंह पाटील (१९ डिसेंबर १९३४- सध्या) - प्रतिभा देवी सिंह पाटील या देशाच्या १२व्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 रोजी झाला. त्यांचा कार्यकाळ 25 जुलै 2007 ते जुलै 2012 असा होता. त्या काँग्रेस पक्षाच्या सदस्या होत्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी प्रतिभा देवी सिंह पाटील या राजस्थानच्या १७व्या राज्यपाल होत्या. 8 नोव्हेंबर 2004 ते 23 जून 2007 या काळात त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या. प्रतिभासिंह देवी पाटील 1962 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी जळगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 1985 मध्ये राज्यसभा सदस्य होईपर्यंत त्या आमदार होत्या. 1991 ते 1996 या काळात त्या अमरावतीमधून लोकसभा सदस्यही होत्या. दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत, प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.

राम नाथ कोविंद (1 ऑक्टोबर 1945-सध्याचे) - राम नाथ कोविंद हे देशाचे 14 वे राष्ट्रपती आहेत. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. 25 जुलै 2017 रोजी त्यांनी देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ 25 जुलै 2022 रोजी संपत आहे. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. 16 ऑगस्ट 2015 ते 20 जून 2017 पर्यंत ते बिहारचे 26 वे राज्यपाल होते. उत्तर प्रदेशातून भारताचे राष्ट्रपती होणारे ते पहिले व्यक्ती आहेत. यापूर्वी 3 एप्रिल 1994 ते 2 एप्रिल 2006 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात 16 वर्षे प्रॅक्टिस केली आहे.

हेही वाचा - Presidential election 2022 : भाजपकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर; वाचा, कोण आहेत द्रौपदी मुर्मू

ABOUT THE AUTHOR

...view details