रायपूर (छत्तीसगड) :विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा ( Oppositions Presidential Candidate Yashwant Sinha ) शुक्रवारी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ( Yashwant Sinha In Chhattisgarh ) होते. यावेळी त्यांनी छत्तीसगडशी त्यांचे विशेष नाते असल्याचे सांगितले. ६० वर्षांपूर्वी भिलाईमध्ये त्यांचे लग्न झाले. त्यामुळे छत्तीसगडबद्दल विशेष प्रेम असल्याच त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आगामी राष्ट्रपती निवडणूकांवरही भाष्य ( Yashwant Sinha On Presidential Election ) केले.
बिनविरोध निवडणूक झाली असती तर बरे झाले असती - यशवंत सिन्हा म्हणाले की, "राष्ट्रपती पद आणि त्याचे कार्य हे अत्यंत प्रतिष्ठेचे कार्य आहे. या पदासाठी निवडणूक झाली नसती तर बरे झाले असते असे मत त्यांनी व्यक्त केले. विचारविनिमय करण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची होती. राष्ट्रपतींची काही कर्तव्येही राज्यघटनेत विहित केलेली आहेत. देशाने मूक राष्ट्रपतीही पाहिले आहेत आणि ज्यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडी नाही. काही कर्तूत्ववान राष्ट्रपतीही देशाला मिळाले आहेत. अशा भावना त्यांनी मांडल्या.
नावाच्या घोषणेपूर्वी झाली बैठक -यशवंत सिन्हा शुक्रवारी रायपूरमध्ये असताना त्यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस आमदारांशी संवाद साधला ( Yashwant Sinha Interacts Chhattisgarh Congress MLAs ) आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी पाठिंबा मागितला. यशवंत सिन्हा म्हणाले की, "केंद्रातील विरोधी पक्षांच्या दोन बैठका झाल्या. त्याशिवाय काही अनौपचारिक भेटीगाठीही झाल्या. यात मला त्यांचा कॉमन उमेदवार व्हायचे आहे का अशी विचारणा झाली. मी होकार दिल्यावर त्यांनी माझे नाव जाहीर केले. मात्र काही वेळाने सत्ताधारी पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला. आणि परिणामी निवडणुका लावण्यात आल्या.