नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वानुमते निकाल देताना सांगितले की, संसदेद्वारे या विषयावर कायदा होईपर्यंत हा आदर्श नियम कायम राहील.
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून : पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वानुमते निकाल देताना सांगितले की, संसदेद्वारे या विषयावर कायदा होईपर्यंत हा आदर्श कायम राहील.
आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमसारखी व्यवस्था : लोकसभेतील विरोधी पक्षनेता नसेल तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीमध्ये सर्वात मोठा विरोधी पक्षाचा नेता असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियमसारखी व्यवस्था असावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर खंडपीठाने हा निकाल दिला. संसदेकडून याबाबत कायदा होईपर्यंत ही पद्धत लागू केली जाईल, असे न्यायमूर्ती केएम जोसेफ यांनी सांगितले.