पणजी - नौदलाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज (रविवारी) गोव्यात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे दाबोलीम विमानतळावर स्वागत केले. त्यांच्यासोबत राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई, प्रोटोकॉल मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत उपस्थित होते. वायू सेनेच्या विशेष विमानाने राष्ट्रपती गोवा विमानतळावर दाखल झाले. पुढे विशेष हेलिकॉप्टरने बांबोलीम हेलिपॅडवर दाखल झाल्यावर त्यांचा ताफा दोना पावला येथील राजभवनकडे दाखल झाला.
सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्रपती पुढील तीन दिवस राजभवनात वास्तव्य करणार असून, राजभवनात राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई व त्यांच्या पत्नीने त्यांचे स्वागत केले. पिल्लई राज्यपाल झाल्यानंतर राष्ट्रपती व राज्यपाल यांची गोव्यातील ही पहिलीच भेट आहे. ऑक्टोबर 2020 ला सरकारच्या गोवा@६० या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती गोव्यात येऊन गेले होते.
सोमवारी सकाळी नौदलाच्या कार्यक्रमात होणार सहभागी