नवी दिल्ली - राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ( President Ram Nath Kovind meets Prime Minister Narendra Modi ) घेतली . राष्ट्रपतींनी त्यांच्याकडून पंजाबमधील त्यांच्या ताफ्यात झालेल्या सुरक्षा भंगाची माहिती घेतली आणि गंभीर त्रुटीबद्दल चिंता व्यक्त ( President expressed concern about PM Security Breach ) केली आहे.
कृषी कायदा रद्द केल्यानंतर पहिला पंजाब दौरा -
पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द करण्यात आला. (Raining In Bathinda When The PM Landed) पंजाबमधील फिरोजपूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारची सभा रद्द करण्यात आली. ( PM Security Breach In Panjab ) त्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला परतले. ( Raining In Bathindan Punjab Tour ) केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हेदेखील या रॅलीत सहभागी होणार होते.
राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते
गृहमंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, (Raining In Bathindan Punjab Tour) "बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे दाखल झाले, तेथून ते हुसैनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पीएम मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती."
कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलेले नाही