नवी दिल्ली - भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ( President of India Ram Nath Kovind ) यांनी आज ( 8 मार्च ) जागतिक महिला दिनानिमित्तराष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात ‘नारी शक्ती पुरस्कार’ - 2020 आणि 2021 ( Nari Shakti Puraskar 2020 2021 ) प्रदान केले. 2020 आणि 2021 या वर्षांसाठी 29 उत्कृष्ट आणि वेगळे काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अठ्ठावीस पुरस्कार - 29 महिलांना महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या उत्कृष्ट कार्याची ओळख म्हणून प्रदान करण्यात आले.
फर्स्ट वुमन स्नेक रेस्क्यूअर वनिता बोराडे यांना नारी शक्ती पुरस्कार -
राष्ट्रपती कोविंद यांनी वनिता जगदेव बोराडे यांना वन्यजीव संरक्षण विशेषतः सापांची सुटका करण्यासाठी नारी शक्ती पुरस्कार प्रदान ( Nari Shakti Puraskar to Vanita Jagdeo Borade ) केला. 50,000 हून अधिक सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडवून ( wildlife conservation particularly rescuing snakes ) , बुलढाणा, महाराष्ट्रातील वनिता यांना 'स्नेक फ्रेंड' आणि 'फर्स्ट वुमन स्नेक रेस्क्यूअर' म्हणून ओळखले जाते.
कोविडमुळे रद्द झाला होता मागील वर्षीचा कार्यक्रम -