महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रपती कोविंद यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस - राजनाथ सिंह कोरोना

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (बुधवार) कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नवी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांनी लस टोचून घेतली. "ही लसीकरण मोहीम भारतासाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या दोन्ही लसींची भारतात निर्मिती केली जात आहे", असे ते यावेळी म्हणाले.

President Kovind receives first dose Of COVID-19 vaccine at Army Hospital in Delhi
राष्ट्रपती कोविंद यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

By

Published : Mar 3, 2021, 3:20 PM IST

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (बुधवार) कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नवी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांनी लस टोचून घेतली. एक मार्चपासून भारतात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यामध्ये साठ वर्षांवरील व्यक्तींना आणि गंभीर आजार असणाऱ्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.

"ही लसीकरण मोहीम भारतासाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या दोन्ही लसींची भारतात निर्मिती केली जात आहे", असे ते यावेळी म्हणाले.

आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अशा मोठ्या नेत्यांनी या टप्प्यामध्ये कोरोना लस घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात एक कोटी ५६ लाख २० हजार ७४९ लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशात १४,९८९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून; 98 जणांचा बळी गेला आहे.

हेही वाचा :पोखरणमध्ये स्फोट, एक बीएसएफ जवान हुतात्मा; दोघे जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details