पणजी : विचार करा, एखाद्या मंदिरात साध्या पद्धतीने तुमचा विवाह सोहळा पार पडतो आहे; आणि अचानक तुमच्या लग्नाला राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही उपस्थित झाले तर? गोव्यातील एका दाम्पत्याच्या बाबतीत असाच प्रकार झाला. राज्यातील प्रसिद्ध महालसा नारायणी मंदिरात विवाह सुरू असलेल्या एका नवदाम्पत्याला राष्ट्रपतींनी आपले आशिर्वाद दिले.
मिळालेल्या माहितीनुसार 'गोवा लिबरेशन डे' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवारी राष्ट्रपती कोविंद हे गोव्यात आले होते. त्यानंतर रविवारी ते पणजीपासून १६ किलोमीटर दूर असणाऱ्या महालसा नारायणी मंदिरात दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राष्ट्रपती कोविंद मंदिर परिसरात पोहोचले, तेव्हा तिथे एक विवाह सोहळा सुरू असल्याचे त्यांना दिसले. यानंतर राष्ट्रपतींनी या नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्याची इच्छा प्रकट केली. राष्ट्रपतींसोबत दर्शनासाठी राज्यपाल कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. त्यांनीदेखील कोविंद यांच्यासह या दाम्पत्याला आशिर्वाद दिले.
दाम्पत्याचा आनंद द्विगुणीत..