महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

President On Tribal Women : आदिवासी महिला असल्याचा अभिमान आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - नवीन संसद भवनाचे उद्घाटन

नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनाचा सध्या चांगलाच वाद सुरू आहे. या वादावरुन न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. मात्र या वादावर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही भाष्य केले आहे. आदिवासी महिला असल्याचा मला अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

President On Tribal Women
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

By

Published : May 26, 2023, 7:06 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन वाद सुरू असून या कार्यक्रमावर तब्बल 19 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. महिला राष्ट्रपती असून आदिवासी असल्यानेच त्यांना डावलण्यात येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. त्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच आता उत्तर दिले आहे. मी आदिवासी महिला असल्याचा मला अभिमानच असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

काय म्हणाल्या राष्ट्रपती :देशात महिला विकास झपाट्याने होत आहे. महिलांनी विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. महिला म्हणून जन्म घेणे किवा आदिवासी म्हणून जन्म घेणे यात कोणतीच वाईट गोष्ट नाही. मी देखील आदिवासी महिला असून माझा जीवनप्रवास तुमच्या समोर आहे. त्यामुळे आदिवासी महिला आणि आदिवासी पुरुषांनीही चांगले कार्य केले आहे. सध्या 28 आदिवासी आमदार आहेत. तर केंद्रातही अर्जुन मुंडासारखे मंत्री चांगले काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी महिलांनी बनवलेल्या विविध उत्पादनांचेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या झारखंड राज्यातील खुंटी येथील महिला परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

काय आहे संसद भवनाच्या उद्घाटनाचे प्रकरण :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या इमारतीचे 28 मे रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊ नये, यासाठी विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला असल्यानेच त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते होणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे.

राष्ट्रपती आदिवासी असल्यानेच त्यांना डावलले :नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन राज्यातील नेतेही आक्रमक झाले आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर राज्यातील विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रपती आदिवासी महिला असल्यानेच त्यांना डावल्याण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशभरातील विरोधी पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यकर्मावर बहिष्कार टाकणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली होती. उद्धव ठाकरे गटानेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

हेही वाचा -

  1. New Parliament Inauguration : राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन व्हावे; सर्वोच्च न्यायालयात याचिका, शुक्रवारी सुनावणी
  2. New Parliament Building: संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटन सोहळ्याला 250 खासदारांचा विरोध
  3. Sanjay Raut On Pm : राष्ट्रपतींना नव्या संसद भवनच्या उद्धाटनाला न बोलवणे हा देशाचा अपमान, विरोधी पक्ष करणार बहिष्कार - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details