महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Job Recruitment 2022 : सरळ सेवा पदांच्या भरतीसाठी तयारी सुरू, मागणी पत्र 'एमपीएससी'कडे त्वरित पाठवा - महा नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा

२५ जानेवारी २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेची रिक्त पदे वेळेवर (recruitment of direct service posts) भरण्याच्या अनुषंगाने पदांची मागणीपत्रे आयोगाकडे विहित वेळेत पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच २०२१ च्या शासन आदेशानुसार शासनाच्या विविध विभागांनी कोणकोणत्या पदांसाठी गरज आहे. याचे मागणी पत्र एमपीएससीला (MPSC) त्वरित पाठवावे असे, आदेश महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव (General Administration orders) यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत. Job Recruitment 2022

Job Recruitment 2022
सरळ सेवा पदांच्या भरती

By

Published : Oct 21, 2022, 4:09 PM IST

२०२१ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या पदांचे (recruitment of direct service posts) मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावे. त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबतची प्रमाणित कार्यपध्दती एमपीएससी (MPSC) कडून (SOP) प्रसिध्द करण्यात आली आहे. त्या पद्धतीने नुसार प्रत्येक शासनाच्या विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणकोणत्या पदांसाठी किती गरज आहे, त्याची तपशीलवार माहिती पाठवण्याबाबत माहिती नमूद करण्यात आली.(General Administration orders) (Job Recruitment 2022)


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. त्यानुसार राज्य सेवेसह सर्व राजपत्रित गट अ व गट-ब संवर्गाकरीता 'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा' या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्या-त्या पदानुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा व मुलाखती स्वतंत्ररित्या घेण्यात येणार आहेत. याच पध्दतीने अराजपत्रित गट क व गट क संवर्गासाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व संबंधित पदानुसार स्वतंत्र मुख्य परीक्षा व मुलाखती स्वतंत्ररित्या घेण्यात येणार आहेत.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पध्दतीत केलेल्या बदलाच्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करीता विविध प्रशासकीय विभागांकडून पदभरतीची परिपूर्ण मागणीपत्रे विहित कालावधीत आयोगास प्राप्त होणे आवश्यक आहे. पूर्व परीक्षेकरीता प्रत्येक वर्गाची स्वतंत्र गुणांची स्वतंत्र सीमारेषा निश्चित करण्यात येणार असून; त्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेकरीता पदांची जाहिरात विज्ञापित करतानाच संबंधित सर्व विभागांकडून परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे.

जाहिरातीमध्ये एखाद्या संवर्गाचा-पदाचा समावेश झाला नाही तर, संबंधित संगगांचा-पदाचा समावेश नंतर कोणत्याही टप्यावर करता येणार नाही व पुढील वर्षांच्या जाहिरातीपर्यंत संबंधित पदे विज्ञापित करता येणार नाहीत. परिणामी पदे ज्ञान झाल्यामुळे शासनाला कर्मचारी उपलब्ध होऊ शकणार नाही. ही बाब विचारात घेता सर्व प्रशासकीय विभागांनी रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवावयाची मागणीपत्र दिनांक २ डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयाद्वारे नुसार केलेल्या कार्यपध्दतीनुसार सेवाप्रवेश नियमातील बदल व अनुषंगिक बाबी तपासून विहित वेळेत पाठविण्याची दक्षता प्रशासकीय विभागांनी व कार्यालयांनी घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव लीनासंखे यांनी सांगितलेले आहे. Job Recruitment 2022

ABOUT THE AUTHOR

...view details